+91 94217 42015

Maharashtra Shikshan Samiti's

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

(Affiliated to S. R. T. M. U. Nanded)

Rules & Regulation

Students should follow the following instructions and rules.

  1. Attendance of students is taken in every lecture.
  2. Minimum 75% attendance per month for each subject is compulsory.
  3. Weekly/fortnightly/monthly/semester/pre-annual etc. conducted by the college. Exam is compulsory for students.
  • Ban on Smoking

It is strictly prohibited to eat tobacco, betel leaves and smoke cigarettes and cigarettes in the premises of the college and strict action will be taken against those who smoke.

Rules Regarding Educational/ Study Tours

Educational trips are organized by the college only during Diwali vacation if necessary for the course of various subjects.

1) According to the government regulations, the use of mobile phones is completely prohibited in the college premises during the examinations.

2) Legal action will be taken against students found guilty of ragging. If found guilty Rs. A fine up to 25000/- will be levied along with closure of classes, deprivation of examination, suspension of scholarships etc. along with criminal charges may be filed. Every student must maintain peace and order in the classroom and surroundings.

  • The following acts constitute disciplinary action.

1) Coming to college without uniform and identity card.

2) Quarrels, violent behaviour or any other unruly behaviour unfit in the educational premises.

3) Taking collective leave without prior permission.

4) Harassment of female students.

5) Disobedience to faculty, rude behavior towards faculty and staff.

6) Writing obscene text and drawing pictures on the college building, desk, board.

7) Loitering in the verandah or standing in front of the class and performing eccentric movements etc.

8) Going on trips without the permission of the college, organizing mutual trips and organizing events like friendship gatherings etc. outside the college. Unruly behavior will be considered.

9 ) Vandalizing, stealing, tearing books in the library etc.

Discipline and Code of Conduct

  • Students must carry identity card in the college and in the college premises. It is better to show it in retrospect.
  • Students should not bring outside persons.
  • Students shall not collect any funds from other students or any outside person without the permission of the Principal.
  • Students should not linger in the verandah during class hours.
  • Students should keep their mobiles switched off after entering the college. If the mobile phone rings, it will be confiscated.
  • Students should not organize any educational trip, expedition, visit, picnic and ceremony etc. without the written permission of the Principal.
  • Students indulging in ragging behavior will be dealt with strictly as per the Prohibition of Ragging Act 1999 (Act No. 33/of 99).
  • The principal will have the right to take action against the students who are behaving out of the rules, their decision will be final and binding.
  • Proceedings under the Prevention of Harassment of Women Act. Abuse –
  • Chewing of tobacco etc. and smoking, spitting on the wall.
  • Coming to college without identity card, making gangs, creating chaos, fighting.
  • Harassment of students.
  • Writing obscene text and drawing pictures on college premises, decks, plaques, boards.
  • Arrogance and disobedience to assistant professors and staff.
  • Students who commit the above misbehavior are first warned, then fined. Educational concessions are discontinued. Examination application is not filled. Admission is canceled and on certain occasions police action is taken against such students.
  • It is the responsibility of the students to see that the notices of the college are posted on the Boards from time to time which are important to all students. The college will not be responsible for any loss due to non-reading of instructions.

 

महाविद्यालयाचे नियम व अटी

विद्यार्थ्यांनी खालील सूचना व नियमांचे पालन करावे.

  • उपस्थिती
  • प्रत्येक तासाला विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतली जाते.
    • प्रत्येक विषयाची दरमहा किमान 75% उपस्थिती अनिवार्य आहे.75% पेक्षा कमी असल्यास दंड आकारला जातो.

ब) पालकांना SMS द्वारे कळविले जाते.

  • सततच्या गैरहजेरीबद्दल विद्यार्थ्यास ताकीद दिली जाते. व महाविद्यालयामार्फत दिल्या जाणा-या सवलती रद्द केल्या जातात.

ड) सातत्याने गैरहजर राहणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जातो.

  • सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, वक्तृत्व व वादविवाद, एन.सी.सी., एन.एस.एस. शैक्षणिक सहली अथवा अन्य कारणासाठी विद्यार्थी महाविद्यालयात अनुपस्थित राहिल्यास प्रभारी प्राध्यापकांच्या स्वाक्षरीसह त्या त्या वेळीच अर्ज कार्यालयात दाखल करणे बंधनकारक राहील.
  • विद्यार्थी आजारी असल्यास आजारानंतर महाविद्यालयात येतांना सोबत वौद्यकीय प्रमाणपत्र आणून कार्यालयात दाखल करणे बंधनकारक राहील. तसेच जास्त दिवस आजारी असल्यास पालकाद्वारे महाविद्यालयास पूर्व सूचना देणे आवश्यक आहे.
  • आजारी पडल्यामुळे रजा मंजूर केली तरी विद्यापीठाच्या नियमानुसार किमान 65% उपस्थिती आवश्यक आहे. (म्हणजेच आजारी रजेसाठी जास्तीत जास्त 10% सवलत देता येते)
  • परीक्षा
    • महाविद्यालयातर्फे घेतल्या जाणा-या आठवडी/पाक्षिक/मासिक/सत्र/पूर्व वार्षिक इ. परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे.
    • परीक्षेत विना परवानगी अनुपस्थित रहाणा-या विद्यार्थ्यांना दंड आकारला जातो.
    • परीक्षेत सर्वाधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात आणि त्यांची नावे श्रेयफलकावर लिहिली जातात..
      • धुम्रपान बंदी

महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, पान खाण्यास व विडी, सिगारेट ओढण्यास सक्त बंदी घालण्यात आलेली असून धुम्रपान करणा-या विरुध्द कडक कार्यवाही केली जाईल.

  • शैक्षणिक सहली

महाविद्यालयातर्फे विविध विषयांच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असल्यास शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.

  • शिस्त – रॅगिंग प्रकरणी देाषी विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. दोषी आढळल्यास रू. 25000/- पर्यंत दंड आकारण्यात येईल तसेच वर्ग बंद करणे परीक्षेपासून वंचित ठेवणे, शिष्यवृती बंद करणे इत्यादी शिक्षेबरोबरच फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गात व परिसरात शांतता, शिस्त पाळणे आवश्यक आहे.

खालील कृत्यांचा शिस्तभंगात समावेश होतो

  • गणवेश आणि ओळखपत्राशिवाय महाविद्यालयात येणे.
  • वर्गात अथवा महाविद्यालयात गटबाजी करणे, भांडण करणे, गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे इ.
  • परस्पर विना परवानगी सामुहिक सुट्टी घेणे.
  • विद्यार्थिनींची छेडछाड करणे.
  • प्राध्यापकांचा आज्ञाभंग करणे, प्राध्यापक व कर्मचा-यांशी उध्दट वर्तन करणे.
  • महाविद्यालयाच्या इमारतीवर, डेस्कवर, फलकावर असभ्य मजकूर लिहणे व चित्रे काढणे.
  • वर्ग चालू असतांना व्हरांडयात रेंगाळणे किंवा वर्गासमोर उभे राहून विक्षिप्त हालचाली करणे इ.
  • महाविद्यालयीन प्रशासनाच्या परवानगीशिवाय सहलीस जाणे, परस्पर सहलीचे आयोजन करणे व महाविद्यालयाच्या बाहेर स्नेह संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित करणे इ. बेशिस्त वर्तन समजले जाईल.
  • वर्गातील/ प्रयोशाळेतील/परिसरातील सामानांची मोडतोड करणे, चोरी करणे, ग्रंथालयातील पुस्तके फाडणे इ.

 

शिस्त आणि आचार संहिता

शिस्त

  • स्वयंशिस्त हीच सर्वोत्तम शिस्त होय. महाविद्यालयीन कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन नियम व अटीचे पालन करणे आवश्यक आहे.
  • महाविद्यालयात किंवा महाविद्यालय परिसरात प्रशासनाच्या परवानगी शिवाय कोणतेही कृती-कार्यक्रम करण्यास मज्जाव राहील. कोणताही राजकीय किंवा अन्य स्वरुपाचा बाह्य दबाव महाविद्यालयावर आणल्यास शिस्तीचे उल्लंघन समजले जाईल.
  • महाराष्ट्र सरकार कायदा आणि महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणारे विद्यार्थी परीक्षेस अपात्र ठरतील.

आचार संहिता

  • महाविद्यालयात आणि महाविद्यालयातील परिसरात विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ते मागताक्षणी दाखविणे त्यास बंधनकारक आहे.
  • विद्यार्थ्यांने बाहेरील व्यक्तींना सोबत आणू नये.
  • विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या परवानगीशिवाय इतर विद्यार्थी किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीकडून कसल्याही प्रकारचा निधी गोळा करु नये.
  • वर्गामध्ये तास चालू असताना विद्यार्थ्यांनी व्हरांडयात रेंगाळत थांबू नये.
  • विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर आपला मोबाईल बंद स्वरुपात ठेवावा. मोबाईल वाजला तर जप्त करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांनी प्राचार्याच्या लिखित परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सहल, मोहिम, भेट, वनभोजन व समारंभ इत्यादी यासारखे कार्यक्रम आयोजित करु नये.
  • रॅगिंग सदृश वर्तन करणा-या विद्यार्थ्यांवर प्रोव्हिबिशन ऑफ रॅगिंग अॅक्ट 1999 (अॅक्ट नं. 33/ऑफ 99) नुसार कडक कार्यवाही केली जाईल.
  • नियमबाहय वर्तन करणा-या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार प्राचार्यांना असतील त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
  • महिला छेडछाड प्रतिबंधक अधिनियम नुसार कार्यवाही करण्याचे अधिकार प्राचार्यांना असतील त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

गैरवर्तन

  • पान, तंबाखू, गुटखा, मावा, मटेरियल इ. खाणे व धुम्रपान करणे, भिंतीवर थुकणे.
  • शैक्षणिक संस्थासह सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी आहे.
  • ओळखपत्राशिवाय महाविद्यालयात येणे, गटबाजी करणे, गोंधळ करणे, भांडणे करणे.
  • विद्यार्थीनींची छेडछाड करणे.
  • महाविद्यालय इमारतीवर, डेक्सवर, फलकावर, बोर्डावर असभ्य मजकूर लिहिणे व चित्रे काढणे.
  • शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांशी उध्दट वर्तन करणे व आज्ञाभंग करणे.
  • उपरोक्त गैरवर्तन करणा-या विद्यार्थ्यांना प्रथम ताकीद दिली जाते, नंतर दंड केला जातो. शैक्षणिक सवलतीबंद केल्या जातात. परीक्षा अर्ज भरला जात नाही.  प्रवेश रद्द केला जातो आणि विशिष्ट प्रसंगी अशा विद्यार्थ्यांवर पोलिस कार्यवाही केली जाते.

सर्वसाधारण सूचनामहाविद्यालयात विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांच्या बौध्दिक आणि नैतिक पातळीवर वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने आणि धैर्याने जीवनातील वास्तवाला तोंड देवू शकतील.  प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ला महाविद्यालयाचा एक घटक समजून आपले वर्तन महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला साजेसे व आत्मसन्मानाचे ठेवावे.  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी आदरभावाने वागणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे कर्तव्य असेल.

नोटीस   महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर वेळोवेळी सूचना लावल्या जातात त्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असतात त्या पाहण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.  सूचना न वाचल्यामुळे होणा-या नुकसानीस महाविद्यालय जबाबादार राहणार नाही.

उपस्थिती – विद्यार्थ्यांची महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे.  ही उपस्थिती न भरल्यास होणा-या आर्थिक व शैक्षणिक नुकसानीस स्वत: जबाबदार राहील.

रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम – 2009

          रॅगिंग करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.  रॅगिगच्या वाढत्या घटनांमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने 2009 मध्ये रॅगिंग करणा-याला कठोर शिक्षेची तरतुद असलेला अधिनियम प्रसारित केला.  रॅगिंगसंदर्भात या विद्यापीठात ‘ रॅगिंग प्रतिबंधक समिती ‘ स्थापन करण्यात आली असून या अधिनियमाची कठोर अंमलबजावणी विद्यापीठात केली जाणार आहे.  रॅगिंग हा दुस-या विद्यार्थ्याला शारिरीक क्लेष होईल असे वर्तन करण्याचा एक घृणास्पद, अमानवी व विकृत प्रकार आहे. रॅगिंगमुळे निष्पाप विद्यार्थ्याचे खच्चीकरण तर होतेच, परंतु रॅगिंगमुळे प्रसंगी एखादा विद्यार्थी प्राणासही मुकू शकतो.  रॅगिगमध्ये खालील बाबींचा अंतर्भाव होतो.

          नवप्रवेशित विद्यार्थ्याला बोलून, लिहून, चिडवून, उध्दटपणे वागवनूक त्याला / तिला मानसिक किंवा शारिरीक इजा पोहचविणे. इतरांची मानहानी करणारे व लज्जा उत्पन्न करणारे वर्तन करणे. नवप्रवेशित विद्यार्थ्यावर वरिष्ठत्वाच्या नात्याने जोरजुलुम करणे, दहशत उत्पन्न करणे, सत्ता प्रस्तापित करणे, त्यांना शिक्षा देणे इ. प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे इतर विद्यार्थ्याना त्रास देणारी कोणतीही कृती करणे.

रॅगिंग करणायाला शिक्षाया अधिनियमात रॅगिंग करणा-या विद्यार्थ्याला कठोर शिक्षेची तरतुद आहे.  दोषी विद्यार्थ्याला खालीलपैकी एक अथवा अधिक शिक्षेस सामोरे जावे लागेल.

  • वर्गात बसणे व इतर शैक्षणिक लाभांपासून वंचित करणे.
  • शिष्यवृत्ती, फेलोशिप यांपासून वंचित करणे.
  • परीक्षेसाठी अपात्र ठरविणे.
  • निकाल राखून ठेवणे.
  • कोणत्याही युवक महोत्सव, टुर्नामेंटमध्ये सहभागास प्रतिबंध करणे.
  • एक ते चार सत्रांपर्यंत निलंबित करणे.
  • शिक्षण संस्थेतील प्रवेश रद्द करणे, तसेच इतर कोणत्याही शिक्षण संस्थेत कांही काळासाठी प्रवेशापासून वंचित करणे.
  • आणीबाणीच्या प्रसंगी विद्यार्थी / विद्यार्थीनींनी रॅगिंग प्रतिबंधक समितीकडे संपर्क साधावा.