विद्यार्थ्यांनी खालील सूचना व नियमांचे पालन करावे.

उपस्थिती -

1)    विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने नेमून दिलेला गणवेश घालणे बंधनकारक आहे.
2)    प्रत्येक तासाला विद्याथ्र्यांची उपस्थिती घेतली जाते.
3)    प्रत्येक विषयाची दरमहा किमान 75%  उपस्थिती अनिवार्य आहे.
4)    प्रत्येक महिन्यातील उपस्थिती 75%  पेक्षा कमी असल्यास-

अ) दंड आकारला जातेा.
ब) पालकांना SMS द्वारे कळविले जाते.
क) सततच्या गौरहजेरीबद्दल विद्याथ्र्यांस ताकीद दिली जाते. व महाविद्यालयामार्फत दिल्या जाणाज्या  सवलती रद्द केल्या जातात.
ड) सातत्याने गौरहजर राहणाज्या विद्याथ्र्यांचा प्रवेश रद्द केला जातो.
5)    सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, वक्तृत्व व वादविवाद, एन.सी.सी. एन.एस.एस. शौक्षणिक सहली अथवा अन्य कारणासाठी विद्यार्थी महाविद्यालयात अनुपस्थित राहिल्यास प्रभारी प्राध्यापकांच्या स्वाक्षरीसह त्या त्या वेळीच अर्ज कार्यालयात दाखल करणे बंधनकारक राहील.
6)    विद्यार्थी आजारी असल्यास आजारानंतर महाविद्यालयात येतांना सोबत वौद्यकीय प्रमाणपत्र आणून कार्यालयात दाखल करणे बंधनकारक राहील. तसेच जास्त दिवस आजारी असल्यास पालकाद्वारे महाविद्यालयास पूर्व सूचना देणे आवश्यक आहे.
7)    आजारी पडल्यामुळे रजा मंजूर केली तरी नियमानुसार किमान 65% उपस्थिती आवश्यक आहे. (म्हणजेच आजारी रजेसाठी जास्तीत जास्त 10% सवलत देता येते)

परीक्षा -

1)    महाविद्यालयातर्फे घेतल्या जाणाज्या आठवडी/पाक्षिक/मासिक/सत्र/पूर्व वार्षिक इ. परीक्षा देणे विद्याथ्र्यांसाठी अनिवार्य आहे.
2)    परीक्षेत विना परवानगी अनुपस्थित रहाणाज्या विद्यार्थ्यांना दंड आकारला जातो.
3)    परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाज्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात आणि त्यांची नावे श्रेयफलकावर लिहिली जातात.

धुम्रपान बंदी -

महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, पान खाण्यास व विडी, सिगारेट ओढण्यास सक्त बंदी घालण्यात आलेली असून ध्रुम्रपान करणाज्या विरूध्द कडक कारवाई केली जाईल.

शौक्षणिक सहली -


महाविद्यालयातर्फे केवळ दिवाळीच्या सुट्टीतच विविध विषयांच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असल्यास शौक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.            

शिस्त -

1)    शासकीय नियमानुसार महाविद्यालयाच्या परिसरात मोबाईल वापरास पूर्णत: बंदी आहे.(Mobile Strictly Prohibited in College Campus) या उपरही मोबाईल आढळून आल्यास तो जप्त केला जातेा व पालकांशिवाय इतर कोणाकडेही परत केला जात नाही.
2)    रॅगिंग प्रकरणी देाषी विद्याथ्र्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दोषी आढळल्यास रू.25000/- पर्यंत दंड आकारण्यात येईल तसेच वर्ग बंद करणे परीक्षेपासून वंचित ठेवणे, शिष्यवृती बंद करणे इत्यादी शिक्षेबरोबरच फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गात व परिसरात शांतता,शिस्त पाळणे आवश्यक आहे.

खालील कृत्यांचा शिस्तभंगात समावेश होतो.

1)    गणवेश आणि ओळखपत्राशिवाय महाविद्यालयात येणे.
2)    वर्गात अथवा महाविद्यालयात गटबाजी करणे,भांडण करणे,गोधळ घालणे, हुल्लडबाजी करणे इ.
3)    परस्पर विना परवानगी सामुहिक सुट्टी घेणे.
4)    विद्यार्थिनींची छेडछाड करणे.
5)    प्राध्यापकांचा आज्ञाभंग करणे, प्राध्यापक व कर्मचाज्यांशी उध्दट वर्तन करणे.
6)    महाविद्यालयाच्या इमारतीवर, डेस्कवर, फलकावर असभ्य मजकूर लिहणे व चित्रे काढणे.
7)    वर्ग चालू असतांना व्हरांडयात रेंगाळणे किंवा वर्गासमोर उभ राहून विक्षिप्त हालचाली करणे इ.
8)    महाविद्यालयाच्या परवानगीशिवाय सहलीस जाणे, परस्पर सहलीचे आयोजन केरणे व महाविद्यालयाच्या बाहेर स्नेह संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित करणे इ. बेशिस्त वर्तन समजले जाईल.
9)    वर्गातील/ प्रयोशाळेतील/परिसरातील सामानांची मोडतोड करणे, चोरी करणे, ग्रंथालयातील पुस्तके फाडणे इ.