Maharashtra Mahavidyalaya has an excellent Library. The library has been carefully planned to have more space and natural lighting for the comfort of the users. It has the capacity to accommodate more students at a time. Besides the comfortable seating and reading environment, the library is well equipped with modern facilities and resources in the form of CD-ROM,online databases, video cassettes, books, journals, back volumes of journals. The library has all the facilities for the students to learn. The Library is committed to provide easily accessible information support to its users.


ग्रंथालयाचे सर्वसाधारण नियम -

1) प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याना शुल्क रूपये 25/- भरून संगणकीय ओळखपत्र घ्यावे लागेल.
2) महाविद्यालयात येतांना विद्याथ्र्यासोबत ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. महाविद्यालयातील कर्मचाज्यांनी मागणी करताच ओळखपत्र सादर करावे लागेल.
3) विद्याथ्र्यांने ग्रंथालय व वाचनकक्षात गणवेशात असणे आवश्यक आहे.
4) डुप्लिकेट ओळखपत्रासाठी रू. 30/- इतके शुल्क आकारण्यात येईल.
5) ग्रंथालयातून ग्रंथ घेत असताना त्याची पाने तपासून घ्यावीत.
6) ग्रंथ हरवल्यास किंवा अत्यंत खराब केल्यास नविन ग्रंथ उपलब्ध करून द्यावा लागेल, अन्यथा ग्रंथाच्या अद्ययावत किंमतीच्या दुप्पट रक्क्म वसून केली जाईल, परंतु ग्रंथाची दुप्पट किंमत रू.50 पेक्षा कमी होत असेल तर कमीत कमी रू.50/- (पन्नास रूपये) किंमत आकारण्यात येईल.
7) अभ्यासिकेतून ओळखपत्रावर घेतलेली पुस्तके किंवा इतर वाचनसाहित्य घरी जाताना परत करावीत, अन्यथा दररोज रू.10/- या प्रमाणे दंड आकारण्यात येईल.
8) दिवाळीच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे देवघेव विभाग चालू राहील. दिवाळी अथवा उन्हाळी संपूर्ण सुट्टीसाठी ग्रंथालयाच्या देवघेव विभागातून पुस्तके मिळणार नाहीत. सुट्टीमधील लागलेला विलंब शुल्क कोणत्याही सबबीवर माफ केला जाणार नाही.
9) ग्रंथालयातील कर्मचारी किंवा संबंधीतांशी असभ्य वर्तन करणे व शिस्त न पाळणाज्या विद्याथ्र्यांच्या ग्रंथालय सवलती बंद केल्या जातील. तसेच अशा विद्याथ्र्यास दंड आकारला जाईल अथवा प्रवेश रद्द केला जाईल.
10) ग्रंथालयासंर्भात विद्याथ्र्याच्या काही तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरूपात वाचनकक्षातील सूचना पेटीत टाकाव्यात अथवा ग्रंथपालाशी संपर्क साधावा.

देवघेव विभाग -

1) ग्रंथालयाच्या देवघेव विभागातून विद्याथ्र्याना पाठयपुस्तके, कथा, कादंबज्या फक्त सात दिवसाकरीता दिले जातील.
2) विद्याथ्र्यांना संगणकीय ओळखपत्रावर सात दिवसासाठी एकच पुस्तक दिले जाईल.
3) संदर्भ ग्रंथ व दुमिळ ग्रंथ घरी दिले जाणार नाहीत मात्र ते वाचनकक्षात ओळखपत्रावर घेवून वाचता येतील.
4) देवघेव विभाग सकाळी 10.00 ते 1.00 व. दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत चालू राहील.
5) वाचनस्पर्धा व लेखन स्पर्धसाठी संबंधीत विभागामार्फत शिफारस केलेल्या विद्याथ्र्यांना ओळखपत्रावरील पुस्तकाशिवाय ग्रंथालयातून अतिरिक्त एक ग्रंथ दिला जाईल.

विशेष पुस्तक पेढी -

1) अकरावी व बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) वर्गाच्या विद्याथ्र्याना रू. 500/- ग्रंथालय शुल्क आकारून वर्षभरासाठी सर्व विषयाची क्रमिक पुस्तके व अन्य आवश्यक ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
2) पुस्तक पेढीतील पुस्तके घेण्यासाठी प्रत्येक विद्याथ्र्यानी संगणकीय ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
3) वार्षिक परीक्षा संपलेल्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत पुस्तक-पेढीतील वर्षभरासाठी दिलेली क्रमिक पुस्तके व ओळखपत्र परत करावीत. मात्र बारावी विज्ञान वर्गाच्या विद्याथ्र्यांनी एम.टी.सी.ई.टी.परीक्षा संपलेल्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत क्रमिक पुस्तके ग्रंथालयात परत करावीत अन्यथा प्रत्येक पुस्तकास प्रतिदिन रू.10/- या प्रमाणे दंड आकारण्यात येईल.

ग्रंथालयातील वाचन कक्ष विभाग -

1) विद्यार्थी -विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वाचनकक्षाची सोय.
2) वाचन कक्षात ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.
3) वाचनकक्षात पाठयपुस्तकाशिवाय स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके, दैनिके, नियतकालिके व प्रश्नपत्रिके व प्रश्नपत्रिका संच इ. वाचनसाहित्य ओळखपत्रावर मिळेल.
4) अभियंात्रिकी व वौद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असलेली सर्व उपलब्ध ग्रंथ व नियतकलिके ओळखपत्रावर देण्यात येतील.
5) संशोधन उपयोगी नियतकालिकाच्या मागील अंकांचे खंड मागणी नुसार संदर्भासाठी ओळखपत्रावर देण्यात येतील.
6) वाचनकक्षात विद्याथ्र्यानी शांतता पाळावी .इतर त्रास होईल असे वर्तन करू नये. बेशिस्तपणा व ग्रंथालय नियमांचे उल्लघन करू नये.