रँगिंग करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.  रँगिगच्या वाढत्या घटनांमुळे विद्यापीठ इनुदान आयोगाने 2009 मध्ये रँगिंग करणाज्याला कठोर शिक्षेची तरतुद असलेला अधिनियम प्रसारित केला.  रँगिंगसंदर्भात या विद्यापीठात  'रँगिंग प्रतिबंधक समिती ' स्थापन करण्यात आली आसून या अधिनियमाची कठोर अंमलबजावणी विद्यापीठात केली जाणार आहे.  रँगिंग हा दुसज्याविद्यार्थ्यांला शारिरीक क्लेष होईल असे वर्तन करण्याचा एक घृण्धास्पद अमानवी व विकृत प्रकार आहे. रँगिंगमुळे निष्पाप विद्याथ्र्यांचे खच्चीकरण तर होतेच, परंतु रँगिंगमुळे प्रसंगी एखादा विद्यार्थी प्राणासही मुकू शकतो. 

रँगिंगमध्ये खालील बाबींचा अंतर्भाव होतो.

.  नवप्रवेशित विद्यार्थ्यांना बालून, लिहून, चिडवून, उध्दटपणे वागनूक त्याला / तिला मानसिक किंवा शारिरीक इजा पोहचविणे.
.  इतरांची मानहानी करणारे व लज्जा उत्पन्न करणारे वर्तन करणे.
.  नवप्रवेशित विद्यार्थ्यांवर वरिष्ठत्वाच्या नात्याने जोरजुलुम करणे, दहशत उत्पन्न करणे, सत्ता प्रस्तापित करणे, त्यांना शिक्षा देणे इ.
.  प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे इतर विद्यार्थ्यांना त्रास देणारी कोणतीही कृती करणे.

या अधनियमात रँगिंग करणा-या विद्यार्थ्यांला कठोर शिक्षेची तरतुद आहे. दोषी विद्यार्थ्यांला खालीलपौकी एक अथवा अधिक शिक्षेस सामोरे जावे लागेल.

.  वर्गात बसणे व इतर शौक्षणिक लाभांपासून वंचित करणे.
.  शिष्यवृत्ती, फेलोशिप यांपासून वंचित करणे.
.  परीक्षेसाठी अपात्र ठरविणे.
.  निकाल राखून ठेवणे.
.  कोणत्याही युवक महोत्सव, टुर्नामेंटमध्ये सीभागास प्रतिबंध करणे.
.  एक ते चार सत्रांपर्यंत निलंबित करणे.
.  शिक्षण संस्थेतील प्रवेश रद्द करणे, तसेच इतर कोणत्याही शिक्षण संस्थेत कांही काळासाठी प्रवेशापासून वंचित करणे.
.  आणीबाीच्या प्रसंगी विद्यार्थी / विद्यार्थीनींनी रँगिंग प्रतिबंधक समितीकडे संपर्क साधावा.